
पुणे : शहरातील शिक्षण संस्थांकडून महापालिकेचा मिळकतकर न भरण्याकडेच कल आहे. या संस्था विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतात, शासनाकडून निधीही घेतात, पण कर भरत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालून सिंहगड इंस्टिट्यूटसह सर्व शिक्षण संस्थांचा मिळकतकर वसूल करण्याचे आदेश द्यावेत, तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनही देण्यास भाग पाडावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.