शैक्षणिक धोरण व्यवस्थेला नवे आयाम देईल - प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण, सहज उपलब्धता, गुणवत्ता, समानता आणि जबाबदारीचे उत्तरदायित्व, या प्रमुख पाच तत्त्वांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. या धोरणातील लवचिकता ही संपूर्ण व्यवस्थेला एक नवीन आयाम देईल, असे मत केंद्रीय केंद्रीय पर्यावरण आणि माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले

पुणे - सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण, सहज उपलब्धता, गुणवत्ता, समानता आणि जबाबदारीचे उत्तरदायित्व, या प्रमुख पाच तत्त्वांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. या धोरणातील लवचिकता ही संपूर्ण व्यवस्थेला एक नवीन आयाम देईल, असे मत केंद्रीय केंद्रीय पर्यावरण आणि माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : ‘उच्च- शिक्षणाची पुनर्रचना’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार मंगळवारी (ता.८) आयोजित केला होता. ‘सिंबायोसिस’चे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बापट, सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण यामध्ये सहभागी झाले होते. 

प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘शैक्षणिक क्षेत्रातील सर्व भागधारकांचा सहभाग घेऊन अधिक लोकशाही पद्धतीने या धोरणाची आखणी व मसुदा तयार केला आहे. नवीन धोरणात काही नवीन संकल्पना नमूद केल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्ता वाढविणे हे या धोरणाचे सार आहे. संशोधनावरील खर्च वाढवून, विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करेल.’’ 

उप-प्राचार्या डॉ. सुनायिनी परचुरे यांनी आभार मानले डॉ. शरयू भाकरे यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educational policy will give a new dimension to the system prakash javadekar