Junnar News : जुन्नर शिक्षक पतसंस्थेची डिजिटल झेप; सभासदांसाठी मोबाईल ॲप सुविधा सुरू

जुन्नर शिक्षक पतसंस्थेने सभासदांसाठी मोबाईल ॲप सुरू करत डिजिटल सेवेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
जुन्नर येथे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या  मोबाईल ॲप सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी अमित बेनके, डॉ. गजेंद्र देशमुख, सचिन मुळे व मान्यवर.

जुन्नर येथे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मोबाईल ॲप सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी अमित बेनके, डॉ. गजेंद्र देशमुख, सचिन मुळे व मान्यवर.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नरतालुक्यात शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या मोजक्या संस्थांपैकी जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्था आहे. पतसंस्थेचे कामकाज हे अन्य सहकारी पतसंस्थांना आदर्श ठरेल असे गौरवोद्गार तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांनी काढले. जुन्नर येथे जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद शिक्षकांसाठी "मोबाईल ॲप सुविधा" सुरू करण्यात आली. याप्रसंगी बेनके बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com