Lok Sabha Poll 2024 : मतदारांची नावे यादीतून वगळल्याने नाराजी ; वगळलेल्या मतदारांमुळे मतदान टक्क्यांवर परिणाम

आंबेगाव बुद्रुक,खुर्द परिसरातील साधारण दहा टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.
effect on voter turnout due to excluded voters names from list lok sabha third phase voting
effect on voter turnout due to excluded voters names from list lok sabha third phase votingSakal

आंबेगाव : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.७) पार पडले.दरम्यान नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या आंबेगाव, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द परिसरातील मतदारांची नावे मतदार यादीतून परस्पर वगळल्याने मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आहे.

आंबेगाव बुद्रुक,खुर्द परिसरातील साधारण दहा टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.तर काही ठिकाणी मृत व्यक्ती जिवंत आणि जिवंत व्यक्ती मृत असल्याची नोंद मतदान आयोगाकडून करण्यात आल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.

आंबेगाव बुद्रुक येथील जाधव आणि दांगट कुटुंबातील साधारण पंचेचाळीस ते पन्नास मतदार लोकसभेच्या निवडणुकीपासून वंचित राहिले आहेत.याशिवाय आंबेगाव खुर्द परिसरातील बऱ्याच नागरिकांना मतदान न करता आल्याने नाराजी व्यक्त केली.

तर आंबेगाव बुद्रुक येथील झीग्रेड सोसायटीतील साधारण चाळीस सदस्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने मतदारांत संभ्रम निर्माण झाला होता.भारती विद्यापीठ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील मतदान केंद्र येथून साधारण दीडशे मतदार यादीतून नाव वगळल्याने मतदान करू शकले नाहीत.

मतदारांचा गोंधळ उडाल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतरेंकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवून मतदारांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मी इंदौरहून मतदानासाठी आलो आहे.

परंतु सकाळी मतदान केंद्रावर गेल्यानंतर माझे आणि माझ्या पत्नीचे नाव मतदार यादीत दिसून आले नाही.मागील निवडणुकीतही आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.यावेळी पुन्हा तीच पुनरावृत्ती झाल्याने आम्हाला मतदान करता आले नाही.ही निवडणूक आयोगाची मोठी चूक आहे.आमच्यासरखे दीडशे ते दोनशे मतदार यादीतून नाव वगळल्याने मतदानास मुकले आहेत.

- आनंदा पाटील ,स्थानिक दत्तनगर

आमच्या सोसायटीतील एकूण आठ विंग मधील साधारण दहा टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.त्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला.तर काही लोकांचे इपीआयसी नंबर चुकीचे असल्याने भलत्याच मतदारांचे डिटेल्स येत होते.

- प्रणय ठक्कर , अध्यक्ष झीग्रेड सोसायटी

आंबेगाव बुद्रुक येथील दांगट आणि जाधव कुटुंबातील साधारण चाळीस ते पंचेचाळीस मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.आंबेगाव स्थानिकांसह इतर मतदारांची नावे वगळल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे.

- संतोष ताठे, माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com