अजितदादांचे ‘घड्याळ’ 
घरोघरी पोहोचवा : जगताप

अजितदादांचे ‘घड्याळ’ घरोघरी पोहोचवा : जगताप

Published on

सोमेश्वरनगर, ता. ३ : ‘‘प्रचाराला दोनच दिवस उरलेले असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले दुःख बाजूला सारून प्रचाराची धुरा आपापल्या खांद्यावर घ्यावी. कुणाच्याही आदेशाची, विनंतीची वाट न पाहता अजितदादांचे ‘घड्याळ’ घरोघरी पोहोचवावे. प्रत्येकाने आपल्या बूथवर लक्ष केंद्रित करा, वैयक्तीक गाठीभेटी घ्या. गाफील राहू नका. करण खलाटे व दिग्विजय जगताप यांच्या मताधिक्याचा विक्रम आपल्याला नोंदवायचा आहे,’’ असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादीचे निंबूत- कांबळेश्वर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार करण खलाटे, पंचायत समिती उमेदवार दिग्विजय जगताप यांच्या प्रचारास गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी वाघळवाडी येथे उमेदवारांनी घरोघरी फिरून प्रचार केला. निंबुत, गडदरवाडी, खंडोबाचीवाडी येथे स्थानिक कार्यकर्त्यांनीच धुरा घेतली आहे. विकासकामांच्या पुस्तिकेच्या वाटपामुळे अजितदादांचा कामाचा डोंगर मतदारांच्या डोळ्यापुढे उभा राहत आहे.
दरम्यान, वाणेवाडी येथे निंबुत गणातील बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी किशोर भोसले शैलेश रासकर, विक्रम भोसले, नवनाथ भोसले, अप्पासाहेब जगताप, नंदकुमार शिंगटे, पोपटराव भोसले आदी उपस्थित होते.
करण खलाटे म्हणाले, ‘‘दुःख असले तरी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना धीर द्या, मतदानाच्या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त करा, असा पवार कुटुंबियांचा आदेश आहे.’’ याप्रसंगी हेमंत गायकवाड, संकेत जगताप, तुषार सकुंडे, धनू गडदरे, यांनी मते मांडली. सतीश सकुंडे व लक्ष्मण गोफणे यांनी, बूथ कमिट्यांसोबत पुढच्या फळीतील नेतेमंडळींनीही हिरिरीने प्रचारात उतरावे, असे मत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com