esakal | पुणे : विद्यार्थ्यांनी 'झेडपी'च्या शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करताहेत असं काही...
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : विद्यार्थ्यांनी 'झेडपी'च्या शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करताहेत असं काही...

- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी शिक्षकांचे प्रयत्न 

- पहिलीच्या प्रवेशाबाबत पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचा अनोखा आर्थिक फंडा 

पुणे : विद्यार्थ्यांनी 'झेडपी'च्या शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करताहेत असं काही...

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) : पालकांनी आपल्या चिमुकल्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच प्रवेश घ्यावा यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पालकांना मार्गदर्शन करीत आहेत. प्राथमिक शिक्षकांनी गावातील लहान मुलांचे सर्वेक्षण केल्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये किती विद्यार्थी प्रवेश घेतील याचा आकडा प्राथमिक शाळेत आहे. परंतु अनेक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीत प्रवेश घेणार असल्याचे सांगत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिवसेंदिवस प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतच घ्यावे अशी विनवणी प्राथमिक शिक्षक पालकांना करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षक पालकांना अनेक गोष्टी सांगत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मराठी शाळा कशी चांगली? आणि तेथे प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण मिळेल? आणि विद्यार्थी  सुसंस्कारीत कसा बनेल? अशा माहितीसह पालकांचे कित्येक लाख रुपयांचा फायदा कसा होईल? याबाबत प्राथमिक शिक्षक पालकांना मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी काही शिक्षक पालकांना कागदावर आर्थिक गणितही मांडून दाखवित आहेत. हा आर्थिक गणिताचा अनोखा फंडा ऐकल्यावर अनेक पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिक्षक सांगत असलेले आर्थिक गणित पुढीलप्रमाणे : 

इंटरनॅशनल शाळांची नर्सरीची फी आहे, ६९ हजार रुपये, असा प्रत्येक वर्षाच्या फीचा तक्ता त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. इतर छुपे खर्च वगैरे मिळून शाळेची वार्षिक फी होते,  १ लाख रुपये आणि  प्रत्येक वर्षाची फी तेवढीच आहे. शाळा दरवर्षी किमान दहा टक्के फीवाढ करते, असे गृहीत धरले तर इयत्ता दहावीपर्यंतची फी ३ लाखाच्या घरात जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नर्सरीपासून दहावी पर्यंत तुम्ही एकूण २४ लाख रुपये शाळेला देता. आता हेच पैसे मासिक स्वरूपात बँकेत रिकरींग डिपॉझिट स्वरूपात एकेका वर्षासाठी गुंतवले आणि वर्षाकाठी मिळालेल्या रकमेला पुन्हा डिपॉझिट मध्ये गुंतवले तर तुम्हाला तुमचा पाल्य दहावी होईपर्यंत एकूण रक्कम मिळते ३९ लाख रुपये. म्हणजेच तुमचा पाल्य दहावी होईपर्यंत तुम्ही तुमचे जवळपास एकोणचाळीस लाखाचे नुकसान करून घेता.

तसेच दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पुन्हा नवीन खर्चासाठी तयार असता ते वेगळेच. तुम्ही जर तुमच्या पाल्याला मराठी शाळेत घातले तर हे सगळे पैसे वाचतील आणि तेच उच्च शिक्षणासाठी वापरता येतील किंवा त्याला व्यवसायासाठी उपयोगी पडतील . मराठी शाळा आपण टिकवून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान देवूया. अशा प्रकारचा संदेश शिक्षक पालकांना देवू लागले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शाळा स्वच्छ आणि निर्जतुकीकरणयुक्त

शिक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांची स्वच्छता करून त्या निर्जंतुकीकरण केल्या आहेत. गावामध्ये 
सर्वेक्षण केलेल्या चिमुकल्यांच्या पालकांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आमचे सर्व शिक्षक मार्गदर्शन करीत 
असल्याचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी सांगितले. 

इयत्ता पहिलीत ७१६ प्रवेश

तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांमध्ये ७०० हून अधिक शिक्षक सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत 
आहेत. यावर्षी आजपर्यंत इयत्ता पहिलीच्या  वर्गात ७१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. प्राथमिक शाळांमध्ये उत्तम दर्जाचे आणि सुसंस्कारक्षम शिक्षण दिले जात असून मुलांनी पुस्तके, गणवेश, पोषण आहार व इतर शैक्षणीक साहित्य मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असल्याचे  भोरचे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी सांगितले.

loading image
go to top