esakal | दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा; रेल्वेने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सूरू
sakal

बोलून बातमी शोधा

Efforts will be made to bring the students stuck in Delhi by train to pune

- अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत अपेक्षित
- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची 'सकाळ'ला माहिती

दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा; रेल्वेने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सूरू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : दिल्लीत अडकलेल्या जवळपास पंधराशेहुन अधिक मराठी विद्यार्थ्यांना रेल्वेने परत आणण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. यासंदर्भात उच्च पातळीवर चर्चा सूरू असून आज (ता.४) संध्याकाळपर्यत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍ
राजस्थानमधील कोटा येथील मुलांना आणण्यात यश आल्यानंतर आता राज्यातील हजारो विद्यार्थी दिल्लीतून असून त्यांना  आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी हालचाली सूरू केल्या आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हे विद्यार्थी राज्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह विविध नेते मंडळींना संपर्क साधला. मात्र आता या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सूरू झाले आहेत.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांना ऑनलाइन लिंक तयार करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने राज्यात आणायचा निर्णय झाला आहे. काही वेळातच रेल्वे मंत्रालयाकडून सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर संबंधित रेल्वेचे वेळापत्रकही हाती येईल. या विद्यार्थ्यांना आणण्याची सर्व तयारी झाली आहे."
"या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर राज्यात आणले जाईल. हे विद्यार्थी राज्याच्या काना-कोपऱ्यातील असून दिल्ली-नागपुर- मुंबई या मार्गे ही रेल्वे यावी, यासाठी हालचाली सूरू आहेत. या स्थानकाहुन विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळगावी पोचविण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी अंतिम निर्णय संध्याकाळपर्यत निश्चित होईल.," अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.


#Lockdown3.0 : घसा ओला करण्यासाठी तळीराम रस्त्यावर; दारुच्या दुकानांबाहेर लाबंच लांब रांगा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारीसाठी, तसेच वैद्यकीय आणि व्यवस्थापनशास्त्र यातील शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी दरवर्षी दिल्ली गाठतात. त्यातील काही विद्यार्थी लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी राज्यात परतले आहेत. तर सध्या जवळपास पंधराशे विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत.