पुणे - शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट एरियामध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. या महिलांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून पुण्यात वेश्या व्यवसायात स्वखुशीने सहभाग घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.