आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरू

प्राथमिक शिक्षकांना पूर्वनियोजित पद्धतीने सुट्या देण्यात आल्याचे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.
School
SchoolSakal

पुणे - पुणे मनपा हद्दीतील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग गुरुवार (ता.११) पासून प्रत्यक्ष सुरू होत आहे. तर राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी (नॅस) आवश्यक तिसरी ते सातवी पर्यंतच्या निवडक शाळाही एक दिवस भरविण्यात येणार आहे. यासंबंधी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षकांना पूर्वनियोजित पद्धतीने सुट्या देण्यात आल्याचे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘शिक्षकांना कमी सुट्या दिलेल्या नाहीत. अपेक्षीत सर्व सुट्या दिल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून आठवी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग, तर पहिली ते सातवी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होणार आहे. शाळा नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसोबतही समन्वय ठेवण्यात आला आहे.’’ आठवीनंतरच्या शाळा नियमित सुरू राहणार आहे.

School
UP सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे वाटप

सर्वेक्षणासाठी ८७ शाळांची निवड -

देश पातळीवर दर तीन वर्षांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) आयोजित करण्यात येते. यावर्षी पुणे मनपा हद्दीतील ८७ खासगी आणि सरकारी शाळांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची यासाठी यादृच्छिक पद्धतीने निवड केली जाते. पहिली ते सातवीच्या शाळांना प्रत्यक्ष वर्ग उघडण्यासाठी कोविडच्या पार्श्वभुमीवर परवानगी नाही. मात्र या सर्वेक्षणात सहभागी शाळांतील संबंधित वर्ग आयुक्त्यांच्या परवानगीने उघडण्यात येणार आहे. यासंबंधी आवश्यकती सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

नॅस सर्वेक्षणासाठी निवडलेल्या ८७ शाळांतील मुख्याध्यापकांची, तसेच क्षेत्रिय कार्यालयांतील सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या सर्वेक्षणासंदर्भात आवश्यक तयारीची माहिती देण्यात आली आहे. निवडलेल्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांशी ऑनलाईन बैठक घेऊन माहिती देण्याची सूचनाही मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

- मीनाक्षी राऊत, सचिव, प्राथमिक शिक्षण विभाग, मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com