मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात १८ टक्के वाढ करण्यात आली असून, प्रवास महागणार आहे; तसेच टोलवसुलीसह मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट पुन्हा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीकडे आले आहे. एक एप्रिलपासून नवीन टोलचे दरपत्रक लागू होईल.

हलक्‍या मोटारींच्या टोलमध्ये चाळीस रुपयांची वाढ झाली असून, नवीन टोल २३० रुपयांवरून २७० रुपयांवर गेला आहे. मिनीबससाठी टोल ३५५वरून ४२०; तर ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ४९३ रुपयांवरून ५८० रुपये करण्यात आला आहे. मोठ्या बससाठी ६७५ रुपयांवरून ७९७ आणि मल्टीॲक्‍सेलसाठी १८३५ रुपये आकारण्यात येतील. 

द्रुतगती मार्गाच्या उभारणीपासून देखभाल दुरुस्ती व टोल आकारणीचे कंत्राट आयआरबी कंपनीकडे होते. काही महिन्यांपूर्वी हे कंत्राट सहकार ग्लोबल कंपनीला देण्यात आले होते. रस्ते विकास महामंडळाने सोमवारी (ता. २४) आयआरबीला पुढील पंधरा वर्षांसाठी टोलवसुलीचे अधिकार दिले. नव्या करारानुसार महामंडळास कंपनीकडून ८ हजार २६२ कोटी रुपये मिळणार आहेत. या मार्गावर गेल्याच वर्षी टोलच्या दरात वाढ करण्यात आली.  होती. टोलवसुलीचे कंत्राट पुन्हा एकदा आयआरबी कंपनीकडे देण्यात आल्यानंतर नव्याने करण्यात आलेली टोल दरवाढ अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली. टोलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने आणि जमा झालेला टोल या आकड्यांचा मेळ जुळतच नाही. दोन कंत्राटदारांच्या आकडेवारीत मोठा फरक आहे. या टोलची चौकशी करण्याची मागणी गेली चार वर्षे करत होत. टोलदरांमध्ये वाढ करण्याचा अन्याय आहे, असे पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

दीड हजार कोटी जादा
एक एप्रिलपासून द्रुतगती मार्गावरील टोलदरामध्ये १८ टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक दरवर्षी पाच टक्‍क्‍यांनी वाढेल, असे गृहीत धरून २००४ मध्ये हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी १८ टक्के दरवाढ करण्याचे ठरले होते. त्यानुसार २००४ ते २०१९ या काळात कंत्राटदाराला २८६९ कोटी रुपये मिळतील, असे गृहीत धरून कंत्राट देण्यात आले. प्रत्यक्षात कंत्राटदाराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ४,३६९ कोटी रुपये मिळाले. ही रक्कम दीड हजार कोटींनी जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com