एकनाथ शिंदे च्या कार्यक्रमाला मनोज जरांगे यांचा विरोध

एकनाथ शिंदे च्या कार्यक्रमाला मनोज जरांगे यांचा विरोध
Published on

एकनाथ शिंदेंच्या परभणीतील
कार्यक्रमाला जरांगेंचा विरोध

खासदार जाधव यांनी डिवचण्यासाठी कार्यक्रम घेतल्याचा आरोप

ॲग्रोवन वृत्तसेवा
वडिगोद्री, जि. जालना ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील कार्यक्रमाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (ता. ३०) विरोध केला. खासदार संजय जाधव यांनी मराठा समाजाला डिवचण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मात्र, वेळेचे नियोजन जुळत नसल्याने परभणीला जाणे रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, ‘‘इकडे आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि तुम्ही तिकडे कार्यक्रम घेत आहात. मी परभणीला येणार होतो; मात्र माझ्या वेळेचे नियोजन जुळत नव्हते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री शिंदे कार्यक्रम आटोपून निघणार होते. त्यामुळे समोरासमोर सामना होणार नाही म्हणून मी परभणीला जाणे रद्द केले.’’
परभणीतील कार्यक्रम रद्द करण्यासाठी आपण जाण्याची तयारी केली होती, असे सांगत जरांगे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. खासदार संजय जाधव यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा समाजाचा विरोध ओढवून घेतला असून, समाज त्यांना माफ करणार नाही, असा दावा त्यांनी केला. पक्ष बदलल्याने पुन्हा निवडून येता येतेच असे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
आरक्षणाच्या मागणीवरून सरकारवर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, ‘‘आरक्षणाला विरोध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिवस भरत आले आहेत. कितीही सीमा बंद केल्या तरी आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार.’’

चौकट ----
शिंदेंचा निरोप कडूंनी जरांगेंना दिला
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरांगे यांना दूरध्वनीवरून दिला. परभणीतील कार्यक्रम पूर्वनियोजित होता आणि तो मुद्दाम आयोजित करण्यात आलेला नाही, असे कडू यांनी सांगितले. त्यानंतर जरांगे यांनी परभणीकडे जाण्याचा निर्णय रद्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com