पर्यायी रस्ता न केल्यास  ऐकता फाउंडेशनतर्फे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पुणे ः: कात्रज- देहूरोड रस्त्यावरून दत्तनगर चौक, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडीकडे जाणारा रस्ता महापालिकेने लवकर चालू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकता फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे- पाटील यांनी दिला आहे. 

दक्षिण पुण्यातील दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून या भागाची ओळख आहे. गेल्या तीस वर्षांपासून वहिवाटीचा असलेला येथील रस्ता अचानक जागा मालकाकडून पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. हजारो वाहने या रस्त्याचा वापर करीत होती, यामुळे परिसरातील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. वाहतुकीचा खोळंबा होत आहे. नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाची गंभीर दखल घेऊन एकता फाउंडेशन, श्री सिद्धिविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान व विठ्ठलराव बेलदरे पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने महापालिकेचे आयुक्त, शहर अभियंता व पथ विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. 

महापालिका प्रशासनाने या रस्त्याला पर्यायी रस्ता न केल्यास नागरिकांना थेट कात्रज चौकाला वळसा घालून संतोषनगरला जाणाऱ्या छोट्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागेल, परिणामी कात्रज चौकातील वाहतुकीवरील ताण आणखी वाढणार आहे. - संदीप शिंदे, रहिवासी, दत्तनगर 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ekta Foundation warns of agiation if no alternative route is taken