
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी भागात पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत सात कुटुंबांचे स्थलांतर केले आहेत. या भागात महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे. एकता नगरी परिसरात द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी आले आहे. खडकवासला धरण साखळीतून ३९ हजार १३८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर हे पाणी परिसरात आले आहे.