Chakan AccidentSakal
पुणे
Chakan Accident : तळेगावातील अपघातात ज्येष्ठाचा जागीच मृत्यू
Bike Accident : चाकणच्या तळेगाव चौकात टेम्पोची दुचाकीला धडक बसून ७० वर्षीय केरू खुरपे यांचा जागीच मृत्यू झाला.
चाकण : येथील तळेगाव चौकात दुचाकीला टेम्पोने जोराची धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात केरू दगडू खुरपे (वय ७०, रा. चिंबळी, ता. खेड) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

