क्राईम २४

क्राईम २४
Published on

सदरबझारमधील
वृद्ध बेपत्ता

सातारा : सदरबझार परिसरातील वृद्ध बेपत्ता झाले आहेत. राजेंद्र दत्तात्रय कांबळे (वय ६०, रा. सदरबझार) असे त्यांचे नाव आहे. याबाबत विनीत राजेंद्र कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला हवालदार पाटील तपास करत आहेत.
...........

जुगार अड्ड्यावर
साताऱ्यात छापा

सातारा : येथील भीमाबाई आंबेडकर नगर परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष रामचंद्र आवळे (रा. भीमाबाई आंबेडकर नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ८१० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार राहुल फडतरे यांनी फिर्याद दिली आहे.
................

डीपीतील ५६ हजारांची
तांब्याची तार लंपास
सातारा : तालुक्यातील दोन ठिकाणावरील वीज वितरण कंपनीच्या डीपीच्या ५६ हजार रुपये किमतीच्या १६० किलो तांब्याच्या तारा चोरीला गेल्या आहेत. शिवथर (ता. सातारा) हद्दीतील डीपीतून झालेल्या चोरीबाबत प्रवीण महादेव टोणपे (रा. आरफळ, ता. सातारा) यांनी, तर आरळे (ता. सातारा) येथील डीपीतून झालेल्या चोरीबाबत अमित लक्ष्मण कोळी (रा. विकासनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महिला हवालदार बोराटे तपास करत आहेत.
...............

विनयभंगप्रकरणी
एकावर गुन्हा
सातारा : शहर परिसरातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल महादेव सणस (रा. रेणावळे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. हवालदार भोंडवे तपास करत आहेत.

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com