ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होणार; निवडणूक आयोगाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होणार; निवडणूक आयोगाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

पुणे - कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रखडलेली ग्रामपंचायतींची प्रभाग रचना येत्या 27 ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 762 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होऊ शकणार आहे. 

कोरोनामुळे पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वर्षअखेरीपर्यंत (31 डिसेंबरपर्यंत) किंवा नव्या वर्षात (जानेवारी 2021) मध्ये होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.

मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. आणखी 12 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 31 डिसेंबरपर्यंत संपत आहे. यानुसार 1 जानेवारी 2020 या तारखेपर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे गावनिहाय ग्रामपंचायतींची प्रभाग रचना निर्मिती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र 9 मार्चला पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने, 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू जाहीर केला. परिणामी ही प्रक्रिया थांबविली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे निवडणूक स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींचे कामकाज प्रशासक पाहत आहे. जिल्ह्यात एक हजार 399 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये आणखी आठ नव्या ग्रामपंचायतींची भर पडली आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com