esakal | गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमद्वारे होणार
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याधर अनास्कर

गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमद्वारे होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांसह सहकारी संस्थांच्या (cooperative housing societi) निवडणुका मतपत्रिकेऐवजी ईव्हीएम मशिनद्वारे घेण्याची बाब विचाराधीन असून, तसा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात येणार आहे. या माध्यमातून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विद्याधर अनास्कर (vidyadhar anaskar) यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने सोमवारी विद्या सहकारी बॅंकेत अनास्कर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे, उपाध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

अनास्कर म्हणाले, राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला बॅंकेमार्फत अल्प व्याजदरात ईव्हीएम मशिन देण्यात येतील. त्या ईव्हीएम मशिन महासंघाच्या माध्यमातून सोसायट्यांना भाडेतत्त्वावर देण्यात येतील. त्यातून महासंघाच्या उत्पन्नाचा स्त्रोतही निर्माण होईल. गृहनिर्माण सोसायट्यांना येणाऱ्या अकृषिक कर, सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास यासह विविध अडचणींबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.

विनाकारण तक्रारी करणाऱ्यांना चाप

बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विशिष्ट सभासदांकडून विनाकारण तक्रारी करून पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे चांगले काम करणारे पदाधिकारीही काम करण्यास पुढे येत नाहीत. तक्रार योग्य असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास ते शुल्क संबंधित सभासदाला परत करावे. परंतु तक्रार खोटी असल्याचे समोर आल्यास दुप्पट शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. त्यावर तक्रार करणाऱ्या सभासदांकडून शुल्क आकारण्याबाबत विचार करण्यात येईल, असे अनास्कर यांनी सांगितले.

loading image
go to top