भारतातील निवडणूक पद्धत सर्वश्रेष्ठ : माजी मुख्य निवडणूक आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 July 2019

पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा 
परीक्षामधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड होते. तेलंगणातील राचीकोंडा येथील पोलिस आयुक्त महेश भागवत, मुंबई येथील माजी पोलिस आयुक्त अरूप पटनायक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. एस. परशुरामन हे प्रमुख पाहुणे होते. देशातून प्रथम आलेला कनिष्क कटारिया, द्वितीय आलेला अक्षत जैन यांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

रावत म्हणाले, "कोणतेही काम करताना 'शॉर्ट कट' वापरू नका. तुम्ही धाडसीपणे आव्हानांचा सामना करत राहिलात तर यश तुमचेच आहे.'' पटनाईक म्हणाले, "यश-अपयश आले तरीही तुमची सकारात्मक ऊर्जा कायम असायला हवी. सरकारी नोकरीमध्ये काम करताना पहिले दोन ते तीन वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. त्यामुळे बोलताना, वागताना कटाक्षाने काळजी घ्यायला हवी.''
 
भागवत म्हणाले, "यश मिळाले तरी तुमचे पाय जमिनीवरच राहायला हवेत. कारण प्रत्येक ठिकाणी अनिश्‍चितता फार वाढली आहे. तसेच तुम्हाला ही गोष्ट का करायची आहे, याबाबतही स्पष्टता हवी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Method of India is best said Former Chief Election Commissioner