Loksabha 2019 : भाजपला मतदान करा म्हणणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे :  कसबा मतदार संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी राजेश भोसले हे मतदारांना भाजपला मतदान करा, असे सांगत होते. त्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. 

पुणे :  कसबा मतदार संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी राजेश भोसले हे मतदारांना भाजपला मतदान करा, असे सांगत होते. त्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी संबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार समजल्यावर आघाडीचे उमेदवार मोहन जोशी केंद्रावर आले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The election officer arrested for promoting BJP at Polling booth