Vidyadhar Anaskar
sakal
पुणे - सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये बँकिंग नियमन कायद्यातील निकषांचे कारण पुढे करून उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ बँकिंग व सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. संचालकांच्या दहा वर्षांच्या कालमर्यादेवरून सुरू असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, सहकार कायद्यात सुधारणा झाल्याशिवाय असा निर्णय घेणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.