
निवडणूक झाली आता वीज, पाणी टंचाईला अग्रक्रम - अजित पवार
पुणे - उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (North Kolhapur Vidhansabha Byelection) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र काम केल्याने चांगले यश (Success) मिळाले. त्यामुले आमची जबाबदारी वाढली आहे. प्रचारादरम्यान कोण काय बोलले याच्या खोलात न जाता, राज्यातील विजेची (Electricity) मागणी, उन्हाळ्यामुळे (Summer) निर्माण होणारी पाणी टंचाई (Water Shortage) यास अग्रक्रम (Priority) देऊन काम केले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून ही जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. या निवडणुकीत काही वेगळे विषय घेऊन समाजात तेढ निर्माण करून मत मिळविण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळाला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांनी एकत्रपणे काम केले त्यामुळे निवडणूक जिंकली.
निवडणुकीत एका मताने जिंकू किंवा लाख मताने जिंकू एकदा जिंकून आल्यानंतर शेवटी त्यांना त्या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे आता जयश्री जाधव यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे, आम्ही त्यास पूर्ण सहकार्य करू. महाराष्ट्रातील विजेची वाढती मागमी, पाणी टंचाई यासह इतर महत्त्वाच्या विषयांना अग्रक्रम देऊन काम करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, निवडणुकीत लोकांना विश्वास वाटावा, त्यांनी मतदान करावे यासाठी म्हणून काही भाष्य केले असावे त्यावर मला काही बोलायचे नाही. आपल्या देशात विविध जात, धर्माचे लोक राहतात, त्यामुळे सर्वांचा सन्मान ठेवला पाहिजे. मारुतीच्या मंदिरात जाऊन आरती करणे काही गैर नाही.
Web Title: Elections Are Over Now Power Water Scarcity Is A Priority Ajit Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..