जुन्नर - निवृत्तीनगर (धालेवाडी) ता. जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी नंतर संचालकांच्या २१ पैकी चार जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील शिरोली बुद्रुक गटातील तीन जागांसाठी चार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज ता.५ रोजी निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
मतदान शनिवार ता.१५ रोजी सकाळी ८ ते ५ वेळेत होणार असून मतमोजणी रविवार ता. १६ रोजी होईल असेही शिंदे यांनी सांगितले.
शिरोली बुद्रुक गटातील उमेदवार पुढीलप्रमाणे - रहेमान आब्बास मोमीन इनामदार, संतोष बबन खैरे, सुधीर महादू खोकराळे व विद्यमान अध्यक्ष सत्यशील सोपानशेठ शेरकर.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातील उमेदवार - रहेमान आब्बास मोमीन इनामदार, सुरेश भिमाजी गडगे, निलेश नामदेव भुजबळ.
अन्य मतदार संघातील बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे - उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) - अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी,
ओतूर गट (चार जागा) - धनंजय डुंबरे,बाळासाहेब घुले,पंकज वामन,रामदास वेठेकर. पिंपळवंडी गट (तीन जागा) - विवेक काकडे,विलास दांगट,प्रकाश जाधव.
घोडेगाव गट (तीन जागा) - यशराज काळे,नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात.
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) - प्रकाश सरोगदे.
भटक्या-विमुक्त जाती- जमाती मतदार संघ (एक जागा) - संजय खेडकर.
विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांचेसह देवेंद्र खिलारी, संतोष खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी आहे.
माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संचालकपदाची संधी मिळाली आहे. तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे हे नवीन चेहरे आहेत.
शिरोली बुद्रुक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणूकीची औपचारिकता बाकी आहे. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी माघार घेतली असल्याचे प्रमोद खांडगे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.