ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका; जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil
ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका; जयंत पाटील

ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका; जयंत पाटील

वारजे - पुणे महापालिकेची (Pune Municipal) प्रभाग रचना (Ward Structure) व्यवस्तीत झाली असेल तर राष्ट्रवादीचे (NCP) जास्त नगरसेवक (Corporator) नक्कीच निवडून येतील. भाजप (BJP) नगरसेवकाचे काम या शहरात म्हणावे एवढे झाले नाही. मात्र, या निवडणुका ओबीसी आरक्षणा (OBC Reservation) शिवाय होणार नाही अशी आमची भूमिका आहे. केंद्रसरकाराच्या दुटप्पी भूमिकेमुळेच ओबीसीला आरक्षण मिळत नाही. असे मत जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाअद्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वारजे येथे केले.

वारजेतील अरविंद बारटक्के रुग्णालयात नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डायलीसिस सेंटर, सोनोग्राफी व एक्सरे रे सेंटरचा लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले कोरोनाच्या काळात खाजगी रुग्नलयानी भरपूर पैसे घेतले. त्यामुळे आरोग्यसेवा आता महत्वाच्या आहेत. याच कोविड मुळे देशाबरोबर राज्यातही बदल झालेला आहे. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ऑनलाईन खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, बाबा धुमाळ, भावना पाटील, त्रिंबक मोकाशी, निलम डोळसकर, शांता नेवसे, सुरेश गुजर, किशोर कांबळे उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : पाषाण ते कोथरुड बोगद्यासाठी सल्लागार

प्रस्ताविकात दीपाली धुमाळ म्हणाल्या की, गरिबांना कमी दरात येथे डायायलिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. येथे 378 रुपयात डायलीसिस तर 50 रुपयात एक्सरे, तर सोनोग्राफी मोफत असणार आहे. अशी माहिती बाबा धुमाळ यांनी दिली. यावेळी शहर अध्यक्ष जगताप, महिला अध्यक्षा चाकणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडीत यांनी केले तर आभार सायली वांजळे यांनी मानले.

निवडणुकीत लाट कोणाचीही असो. मात्र वारजेत राष्ट्रवादी नेहमी अग्रेसर असतें. हे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत दिसुन आले आहे. याचे कारण वारजेत चारही नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाईन भाषणात सांगितले.

Web Title: Elections Without Obc Reservation Role State Government Jayant Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top