संक्षिप्त
रस्त्याच्या मध्यभागी विजेचा डीपी; वाहतुकीला अडथळा
सोलापूर : दमाणी नगर येथील खामीतकर अपार्टमेंटसमोर, रेल्वे बोगद्याच्या पुढे रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला विजेचा डीपी सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. डीपीमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, ये-जा करणाऱ्या वाहनांना वळसा घालावा लागत आहे. परिणामी येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. विशेषतः सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. रेल्वे बोगद्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर डीपी असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित वीज वितरण कंपनी व महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून डीपीचे स्थलांतर करावे,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
----
युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक
सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात केलेल्या आंदोलनावेळी भाजयुमोतर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलांचा हार देखील घालण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘धिक्कार असो धिक्कार असो हर्षवर्धन सपकाळचा धिक्कार असो'' अशा घोषणा दिल्या. यावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष विजय कुलथे, विश्वनाथ प्याटी, यतिराज होनमाने, निशांत सावळे, अंबादास पामू, सिद्धांत धोत्रे, ओंकार होमकर, शिवानंद कावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

