पुणे : तुमच्या भागातील वीजपुरवठा खंडित झालाय? वाचा कधी होणार सुरळीत

पुणे : तुमच्या भागातील वीजपुरवठा खंडित झालाय? वाचा कधी होणार सुरळीत

पुणे : वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर  वीज पुरवठा खंडीत झाला असून, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वीज पुरवठा दुपारी तीन पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत होईल, अशी शक्यता महावितरण विभागाने वर्तवली आहे.

पुण्यासह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक सुमारे 550 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला. यातील काही भाग रात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आला. मात्र आजही पुण्याच्या बहुसंख्य भागात वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेक मोठ्या सोसायटीत पाण्याचे पंप बंद राहिल्याने नागरिकांना पाणी मिळाले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर यांचा परिणाम झाला आहे.
पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. जोरदार पावसामुळे तसेच क्रेन उपलब्ध न झाल्याने रात्री हे काम करता आले नाही. आज सकाळपासून ठिकठिकाणी झाडे हटवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती महावितरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत राऊत यांनी दिली. 
महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वादळाचा सर्वाधिक फटका जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसराला बसला आहे. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आज काम सुरू करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद पडला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो टप्प्या-टप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. दुपारपर्यंत या भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com