

वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
नगर तालुका, ता. २० ः भोरवाडी शिवारात वीज वितरण कंपनीने केलेल्या कारवाईत विजेच्या खांबावरून आलेल्या सर्व्हिस वायरवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या सारोळा कासार शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (वय ४३, रा.देहरे, ता.नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी अभियंता बराट यांच्यासह वीज कर्मचारी अरुण शिंदे, दत्तात्रय सातपुते हे पंच ऋषिकेश एकशिंगे व संजय कुटे यांच्या सोबत ६ मे रोजी दुपारी भोरवाडी परिसरात वीज चोरी शोधत असताना गणपत गोविंद पानसरे (रा. भोरवाडी) यांनी घराजवळील विजेच्या खांबावरून त्यांच्या घराच्या मीटरकडे आलेल्या सर्व्हिस वायरवर आकडा टाकून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. गणपत पानसरे यांनी गेल्या वर्षभरात सुमारे ३० हजार ७६० रुपये किंमतीची १७५६ युनिट वीज चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.