‘समर्थ’मध्ये इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅबचे उद्घाटन
बेल्हे, ता. ३ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅबचे उद्घाटन, नुकतेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. बेल्हे येथे समर्थ शैक्षणिक संकुलात इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, अशोक घोडके, एम. डी. घंगाळे, जानकू डावखर, प्रदीप पिंगट, जी. के. औटी, सरपंच मनीषा डावखर, लहू गुंजाळ, विनायक आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘‘इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅब केवळ एक दालन नसून, तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संधी उघडणारे केंद्र ठरेल,’’ असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. ‘‘इलेक्ट्रॉनिक्स विषयी फारशी माहिती नसणाऱ्यांनादेखील हे प्रदर्शन पाहिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विषयी कुतूहल निर्माण होईल अशी ही म्युझियम लॅब आहे,’’ असे यावेळी माजी आमदार अतुल बेनके म्हणाले.
दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील इतिहास, प्रगती आणि नवकल्पना यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने हे म्युझियम उभारल्याचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी सांगितले. या म्युझियममध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या मूळ संकल्पना, कॅपॅसिटर, रेसिस्टर, ट्रांजिस्टर यापासून तयार केलेले सर्किट व त्याची कार्यप्रणाली कशी चालते याचे प्रदर्शन मांडले होते. दरम्यान हे म्युझियम तयार करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. निर्मल कोठारी, प्रा. सुचिता साबळे, प्रा. दीपाली गडगे, प्रा. प्रियांका पोटफाडे यांच्यासह सार्थक देशमुख, वेद कढणे, आदित्य चौधरी, प्रज्वल चौधरी, साहिल खरगे, यश गुंजाळ या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

