

पुणे : आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींची सन्मान योजना नुकतीच सुरू करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे ७ कोटी ६५ लाख रुपयांचे मानधन जमा करण्यात येणार आहे. १९७५ ते १९७७ या कालावधीत बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याबाबत निश्चित करण्यात आले होते. या धोरणांतर्गत पात्र व्यक्तींना मानधन वितरित करण्यात आले. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासंबंधी धोरणाची अंमलबजावणी बंद करण्याचा निर्णय ३१ जुलै २०२० रोजी घेण्यात आला होता.
ही बंद करण्यात आलेली सन्मान योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने १४ जुलै २०२२ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार एक ऑगस्ट २०२२ पासून ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या निर्णयातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२२ पासून मानधन वितरित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या तीन महिन्यांसाठी ७ कोटी ६५ लाख रुपये मानधन सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आले आहे. ही मानधनाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.