

मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, तरीही कॉल करा अन् मदत मिळवा
.....
तात्या लांडगे
........
सोलापूर : उत्सव काळात चोरी, घरफोडी, दरोड्यासारख्या घटना घडतात. आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास मोबाईलमध्ये बॅलन्स नसला तरीदेखील ११२ या क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत मागता येईल. याशिवाय आग लागल्यास किंवा अपघात झाल्यावरही याच क्रमांकावर संपर्क साधता येईल. अवघ्या ५ ते १५ मिनिटांत पोलिसांची मदत मिळेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अडचणीच्या वेळी पोलिस, अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिकेची मदत हवी असल्यास, अथवा गावात अवैधपणे दारू विक्री, निर्मिती व वाहतूक सुरू असल्यास मोबाईलमध्ये बॅलन्स नसतानाही फोन करून मदत मागता येते. दुसरीकडे, स्वतःच्या कामासाठी शासकीय कार्यालयात गेल्यावर कोणी लाच मागत असल्यास संबंधित व्यक्ती टोल-फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करू शकणार आहे. हे टोल-फ्री क्रमांक सर्वांसाठी ‘विघ्नहर्ता’ ठरत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गावात किंवा नात्यातील कोणत्याही मुला-मुलीचा बालविवाह होत असल्यास त्यासाठीदेखील स्वतंत्र टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणूक केली असल्यास घरबसल्या टोल-फ्री क्रमांकावरून तक्रार नोंदवता येणार आहे.
---
हे क्रमांक लक्षात ठेवाच...
आणीबाणी मदत (रुग्णवाहिका, अग्निशामक व पोलिस) : ११२
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (तक्रार नोंदणी) : १०६४
बालविवाह रोखण्यासाठी (चाइल्ड हेल्पलाइन) : १०९८
अवैध दारू निर्मिती व विक्री तक्रार : १८००२३३९९९९ (व्हॉट्सॲप : ८४२२००११३३)
सायबर फसवणूक (राष्ट्रीय हेल्पलाइन) : १९३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.