सध्या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मते मिळविण्यासाठी उमेदवार केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडत आहेत. इंदापूर तालुक्यांमध्ये निवडणूकीच्या प्रचाराला कामांचा लेखा-जोखा मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची वेळ आली.
वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार भोवला असून जाहीर सभेमध्ये अडसाली उसाच्या आधी खोडवा उसाची तोडणी केल्याने कारखान्याच्या प्रशासनाने वसंत पाडुरंग शिंदे या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित केले.
सध्या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मते मिळविण्यासाठी उमेदवार केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडत आहेत. इंदापूर तालुक्यांमध्ये निवडणूकीच्या प्रचाराला कामांचा लेखा-जोखा मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची वेळ आली.
अकोले ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अंकलेश्वर ग्रामविकास पॅनेलमधून प्रभाग- ४ मध्ये छत्रपती कारखान्याच्या शेतकी विभागामध्ये काम करणारे वसंत पांडुरंग शिंदे निवडणूकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. शिंदे यांनी गावामध्ये मंदिरातील प्रचारसभेमध्ये भाषण करताना विकासावरती बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, ''लोकांचे उसा तोडणी राहिली आहे. मात्र तुमचे खोडव्यासहित तोडले असल्याचे सांगितले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाला फोन करुन सभासदांनी कारभारावर नापसंती दाखवली. कारखान्याने तातडीने शिंदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन कारखान्याने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन केले नसून गैरवर्तन केल्याबद्दल पुढील आदेश होईपर्यंत कारखान्याच्या सेवेमधून निलंबन केल्याचे पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.एम. अनारसे यांनी शिंदे यांना दिले.