Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील कर्मचारी सुधारित वेतनाविना

दोन वर्षांपासून कर्मचारी महापालिकेच्या वेतनश्रेणीच्या प्रतिक्षेत असून त्यांना महापालिकेचा कोणताही लाभ मिळत नाही.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

कात्रज - महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, कोळेवाडी, जांभुळवाडी, पिसोळी या दक्षिण पुणे परिसरातील गावांसह २३ गावांतील ४०८ कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून सुरु असलेल्या ग्रामपंचायत काळातील कमी वेतनावरच या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.

दोन वर्षांपासून कर्मचारी महापालिकेच्या वेतनश्रेणीच्या प्रतिक्षेत असून त्यांना महापालिकेचा कोणताही लाभ मिळत नाही. या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून लवकरात लवकर नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी होत आहे.

२८ फेब्रुवारी २०२३ रोजी या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कामकाजानुसार रुजू करण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून वेतनश्रेणी किंवा अन्य लाभ मिळत नसल्याने हा आदेश लालफितीत अडकल्याचे दिसून येते. हे सर्व कर्मचारी नियमित असून बोगस कर्मचारी भरती प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही.

याबाबत प्रशासकीय पडताळणी होऊनही या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. साधारणतः ८ ते १२ हजारात हे कर्मचारी काम करतात. त्यात घरभाडे, किराणा भागत नसल्याच्या तक्रारी असून साफसफाई, पाणीपुरवठा आदी कामे हे कर्मचारी करतात.

मागील दोन वर्षांपासून महापालिकेची वेतनश्रेणी मिळण्याआधीच अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करुनही त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. कमी पगारावरच त्यांना निवृत्त व्हावे लागले असल्याने अन्य कामागारांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महागाई वाढली असून मुलांचे शिक्षण, आजारपणाचा खर्च भागत नाही. त्यामुळे आर्थिक हलाखीला तोंड द्यावे लागत असल्याचे कर्मचारी आकाश गुजर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

२३ गावांतील कर्मचाऱ्यांबाबत माहिती संकलित करण्याचे काम चालू असून ९ गावांचे पूर्ण झाले असून लेखा शाखेला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित १४ गावांचे पुढील १५ दिवसांत होईल. काही शंकाचे निरसन करण्याचे काम सुरु असून सर्व ठरावांचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. आयुक्तांच्या सर्व शंकाचे निरसन झाल्यास लवकरच नवीन वेतनश्रेणी लागू होईल.

- सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका

महापालिका समावेशानंतर कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा, रजा आदी गोष्टींसह वेतनवाढ मिळायला हवी. पण, ती प्रशासनाच्या लालफितीत अडकली असून महापालिका समावेशाचा काहीच फायदा कर्मचाऱ्यांना झालेला नाही. ग्रामपंचायतीतील कर्मचारी कामाला कुठेही नसल्याने पालिका प्रशासनाने ही वेतनश्रेणी लवकरात लवकर लागू करावी.

- दिपक गुजर, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी

अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतचा जो पगार आहे तोच पगार आहे. यामध्ये अनेकांना पाच किंवा सहा हजार रुपये पगार आहे. यामध्ये भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वेतनश्रेणीनुसार पगारवाढ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

- निलेश मळेकर, कर्मचारी, भिलारेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com