Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

पुणे शहरातील रस्ते झाडण्यासाठी नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुकादम, आरोग्य निरीक्षकांकडून यास सहकार्य केले जात नसल्याचा प्रकार आला समोर.
Pune Garbage issue

Pune Garbage issue

sakal

Updated on

पुणे - शहरातील रस्ते झाडण्यासाठी नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुकादम, आरोग्य निरीक्षकांकडून यास सहकार्य केले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रस्ते झाडूनही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. त्यावरून अधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन झाडाझडती केली आहे. शहर स्वच्छतेत कसलीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. झाडणकामाला सहकार्य करा, रस्त्यावर पडून असलेला कचरा वेळीच उचला अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com