amitesh kumar
sakal
पुणे - ‘पोलिस विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतो, त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्य करीत आहे. पुण्यातील दोन्ही कार्यालयांद्वारे ४७ लाख सभासदांना सेवा देणे ही मोठी जबाबदारी असून, या सेवेमुळे असंख्य कुटुंबांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे,’ असे गौरवोद्गार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले.