खूशखबर ! साडेचारशेहून अधिक क्षेत्रात उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

  • रोजगार अधिकार अभियानाचा शुभारंभ
  • साडेचारशेहून अधिक क्षेत्रात उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

पुणे : करोनाच्या संकंटामुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांचे रोजचे जगणे कठीण झाले. सुशिक्षीत, उच्चशिक्षीत असूनही लाॅकडाऊनमुळे अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले. या कठीण काळात महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने अन्नदान, औषध वाटप आदी प्रकल्प हाती घेण्यात आले होते. आता याच अभियानाचा पुढील भाग म्हणुन 'रोजगार अधिकार अभियाना'चा प्रारंभ करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि बोधिवृक्षास जल अर्पण करुन अभियान यशस्वीतेसाठी कटिबद्धता प्रतिपादीत करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
--------- 

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते राहूल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, विठ्ठल गायकवाड, बाबा कांबळे, लताताई राजगुरु, कुणाल राजगुरु, अरुण गायकवाड, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी, भाई विवेक सावंत, दत्ता पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. रोजगार अधिकार अभियाना अतंर्गत कुशल अकुशल कामगारांशी संबंधीत सुमारे साडेचारशेहून अधिक क्षेत्रांत रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते राहूल डंबाळे यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment Campaign Launch by Ramamai Bhimrao Ambedkar Memorial Committee and Republican Party

Tags
टॉपिकस