युवक-युवतींना मिळाला रोजगार; बारामती, मंचरलाही होणार रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 173 युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, 1 फेब्रुवारीला बारामती येथील चिराग गार्डन येथे आणि 2 फेब्रुवारीला मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे : पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 173 युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, 1 फेब्रुवारीला बारामती येथील चिराग गार्डन येथे आणि 2 फेब्रुवारीला मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि शिरूर तालुक्‍यांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी अल्पबचत भवन येथे शुक्रवारी (ता. 31) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी तीनशे सुशिक्षित युवक-युवती उपस्थित होते. त्यापैकी 173 युवक-युवतींना मंत्रा, एल अँड टी, बिग बझार, व्हीएलसीसी, कॅफे कॉफी डे, अजी-केअर, प्रॉपर्टी सोल्यूशन्स, अर्थ सोल्यूशन्स, पिंक वॉरियर्स आणि कोरोनेट ग्रूप या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. या कंपन्यांनी 232 युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

या मेळाव्यास विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment opportunities for youth Baramati Manchar will also have employment camp