
कात्रज : महिलांचे हक्काचे व्यासपीठ ‘सकाळ’ने महिलांसाठी ‘मैत्रीण प्रश्नमंजूषा-२०२५’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे कात्रजमध्ये महिलांनी उत्साहाने स्वागत केले. स्पर्धेत संपूर्ण कुटुंब सहभाग घेऊ शकत असल्याने महिलांनी स्पर्धा समजून घेण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आयोजन भैरवी सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने केले होते.