Sakal Relief Fund Grants Over rupees 80 Lakh to Flood-Affected Schools
sakal
पुणे - धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ व दक्षिण सोलापूर या पाच तालुक्यातील पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या ४१ आणि संस्था संचालित ३ माध्यमिक अशा एकूण ४४ शाळांना ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून ८० लाख १० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते मुख्याध्यापकांकडे हा निधी देण्यात आला.