ज्येष्ठ नागरिक हे समृद्ध अनुभवांचे संचित
पिरंगुट, ता. २१ : ‘‘ज्येष्ठ नागरिक म्हणजे समृद्ध अनुभवांचे संचित. नव्या पिढीने या अनुभवांचा सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी उपयोग करावा. त्यातून लोकहित व राष्ट्रहित साध्य होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठाकडून सहकार्य केले जाईल,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे संचालक डॉ. हरीश नवले यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लवळे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लवळे (ता. मुळशी) येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॅा. नवले बोलत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. या वेळी रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धोंडिबा कुंभार, कार्याध्यक्ष ॲड. उत्तमराव ढोरे, प्रा. भरत कानगुडे, प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर, सतीश पळणीटकर, सुषमा पळणीटकर, डॉ. गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी सतीश पळणीटकर व सुषमा पळणीटकर यांनी भजन, गवळणी, चित्रपट गीत सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले. डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा गझल वाचनाचा कार्यक्रम झाला. प्रा. भरत कानगुडे यांनी ‘ज्येष्ठांसाठी माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करून फसवणूक होऊ नये म्हणून ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शिबिराच्या आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहन देशमुख, सहसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, माजी सरपंच संजय सातव, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघातील कार्यकारिणी यांनी मार्गदर्शन केले. केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. संतोष वाढवणकर, प्रा. दीप सातव, प्रा. गणेश डोके यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

