Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

‘एम्प्रेस गार्डन हा केवळ एक उद्यानाचा भूखंड नाही, तर पुण्याचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा आहे.
empress garden pune

empress garden pune

sakal

Updated on

पुणे - पुण्याच्या ऐतिहासिक आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमधील अडीच एकर जागा न्यायालयीन बांधकामासाठी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला ‘दि ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे उद्यानातील हरित क्षेत्र आणि जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्याचा दावा संस्थेने केला असून, शासनाच्या निर्णयाविरोधात पुणेकरांमध्ये जनमत जागृत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com