

Annual Flower Show Begins at Empress Garden Pune
Sakal
घोरपडी : पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फुलांचा उत्सव सुरू होणार आहे. हे पुष्पप्रदर्शन दि. २३ ते २७ जानेवारी या कालावधीत भरविण्यात येणार असून निसर्गप्रेमी, पुष्पप्रेमी आणि पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.