घोरपडी - अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्यावतीने एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व सकाळ समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, जेष्ठ समाजसेविका सुमन किर्लोस्कर, मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे,माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.