Pune News : कमी पाण्यातील ज्वारी लागवडीला प्रोत्साहन; पावसाच्या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यात १५,८६० बियाणांचे मिनीकिटचे वाटप

पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
jowar crop

jowar crop

sakal

Updated on: 

पुणे - पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे वाटप करण्यात येणार आहे. यातून ६३४ क्विंटल ज्वारीचे बियाणे उपलब्ध होणार आहे. नियमित वाटपाव्यतिरिक्त यंदा प्रथमच अतिरिक्त मिनीकिट उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, ज्वारीचे प्रत्यक्ष क्षेत्र पेरणीपुरता पाऊस होण्यावर अवलंबून राहणार आहे.

Loading content, please wait...