
पिंपळे गुरव : नवी सांगवीतील साई चौक ते जुनी सांगवी पोलिस चौकी मार्गालगत पीडब्ल्यूडी मैदान आहे. या परिसरात पथ असूनही नागरिकांना थेट रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. येथील पदपथ पूर्णपणे अतिक्रमणाच्या ताब्यात गेला आहे. परिसरात स्थानिक दुकानदारांनी आपले साहित्य, स्टॉल पदपथावरच लावले आहेत. पाणीपुरवठा विभागाने रस्त्यावर खोदकाम केल्याने पदपथाशेजारील जागाही बंदिस्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या मधून चालावे लागत आहे.