
पुणे : अतिक्रमण कारवाईसाठी सय्यदनगर येथे गेलेल्या पुणे महापालिकेच्या पथकावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. त्यामध्ये अधिकाऱ्यास गंभीर दुखापत होऊनही संबंधितांवर ठोस कारवाई झाली नाही. राजकीय दबावातून केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार पोलिसांनी पार पाडले. याच पद्धतीने अतिक्रमण विभागाच्या पथकांना कारवाईदरम्यान दररोज शिवीगाळ, धमक्या, मारहाणीसारख्या घटनांना सामोरे जावे लागते. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही कडक कारवाई होत नाही तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनही याकडे डोळेझाक करत असल्याची सद्यःस्थिती आहे.