
पुणे : रस्त्यावर, पादचारी मार्गावर फर्निचर, स्टॉल, हातगाडी यासह अन्य सामान ठेवून अतिक्रमण केल्याने नेहरू रस्ता कायमच कोंडीत सापडलेला असतो. तेथे आज महापालिकेने अतिक्रमण कारवाई करून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. त्याच प्रमाणे धानोरीतील रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करून ९ हजार ३०० चौरस फुटावरील अतिक्रमण काढून टाकले.