
पुणे : शहरातील नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटल्याने महापालिने आज (ता. ५) पुन्हा एकदा मोठी करावाई करत सुमारे १२ हजार ५०० चौरस फुटावरील बांधकामे, शेड पाडून टाकण्यात आले आहे. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमण करण्याची हिंमत व्यावसायिकांकडून होत असल्याने महापालिकेची भिती कमी झाल्याचेच चित्र या रस्त्यावर दिसत आहे.