खडकवासला - सिंहगड किल्ल्यावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत यंत्रसामग्रीचा वापर शक्य नसल्यामुळे संपूर्ण कारवाई मनुष्यबळाच्या आधारे पार पाडली जात आहे. गडाचा भूगोलामुळे जेसीबी किंवा इतर मोठ्या वाहनांची ने-आण करता येत नसल्याने स्थायिक आरसीसी पक्की बांधकामे हातानेच पाडावी लागत आहेत.