
पुणे : वडगाव शेरी, विमाननगर, खराडी, सिंहगड रस्ता भागात महापालिकेने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुन्हा अवघ्या तासाभरात रस्त्यावर अतिक्रमण थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईवरच प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आज शनिवारवाडा ते स्वारगेट चौकापर्यंत कारवाई केली. यामध्ये फक्त दोन हातगाडी आणि ६ अनधिकृत पथारी व्यावसायिकच अतिक्रमण विभागाला सापडले.