विद्यापीठात एनर्जी स्टोअरेज लॅब

Pune-University
Pune-University

पुणे - ‘‘विजेवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘इलेक्‍ट्रॉनिक मोबिलिटी’कडे वाटचाल सुरू असताना ऊर्जा साठवण्याची अर्थात बॅटरींची क्षमता वाढवण्याची आवश्‍यकता आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज निर्माण होऊ शकते. मात्र, ती रात्री वापरण्यासाठी स्टोअरेज व्यवस्था आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने ‘एनर्जी स्टोअरेज’कडे अधिक लक्ष देण्याकरिता विद्यापीठात ‘एनर्जी स्टोअरेज’ प्रयोगशाळा सुरू केल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

विद्यापीठात उभारण्यात आलेली ‘एनर्जी स्टोअरेज टेक्‍नॉलॉजी लॅब’ ही इनक्‍युबेशन सेंटरचीच सुरवात आहे. त्याअंतर्गत सुरू करण्यात येणारी पहिली महत्त्वाची प्रयोगशाळा म्हणून या लॅबकडे पाहिले जात आहे. विद्यापीठाच्या आंतरशास्त्र ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागातर्फे सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन एनर्जी स्टोअरेज या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन डॉ. करमळकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. ‘एक्‍साईड’ कंपनीने ही ‘एनर्जी स्टोअरेज टेक्‍नॉलॉजी’ प्रयोगशाळा उभारण्यासाठी, तसेच संशोधनासाठी लागणारी वैज्ञानिक उपकरणे खरेदी करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार त्याची उभारणी केली आहे. या वेळी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष जितेंद्र कुमार, चिंचवड प्रकल्पाचे मुख्य कार्यपालन व्यवस्थापक श्री. के. अनिरुद्ध,शाश्वती बोस, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम, आंतरशास्त्र ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदेश जाडकर उपस्थित होते.

या विभागात काही प्रमाणपत्र, पदविका आणि एम. टेक. (एनर्जी स्टोअरेज टेक्‍नॉलॉजी) हे अभ्यासक्रम येत्या काळात सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती डॉ. जाडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा पाठक यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com