

पुणे, ता. २४ : राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (बी.ई. आणि बी.टेक.) प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत तब्बल एक लाख १६ हजार ६९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या फेरीत नऊ हजार ७६६ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या सहापैकी एका पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी सोमवारी जाहीर झाली. या तिसऱ्या यादीत दोन लाख चार हजार ९८७ विद्यार्थ्यांपैकी एक लाख १६ हजार ६९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. राज्यात अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी दोन लाख चार हजार ९८७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. या विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या फेरीत करण्यात आला. यापैकी एक लाख १६ हजार ६९० विद्यार्थ्यांना विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये ११ हजार ५०५ विद्यार्थ्यांना प्रथमच अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर, एक लाख पाच हजार १८५ विद्यार्थी बेटरमेंटचे आहेत.
तिसऱ्या फेरीत नऊ हजार ७६६ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार, पहिल्या सहापैकी एका पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑटो फ्रीज झाले आहेत. त्यांना संबंधित महाविद्यालयातच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. काही कारणाने प्रवेश नाकारल्यास त्यांना चौथ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत (संस्थात्मक फेरीत) सहभागी होता येणार आहे.
बी.ई./बी.टेक. प्रवेश
- एकूण उपलब्ध जागा : २,०३,२७०
- पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश : ६२,६०९
तिसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक
- प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात हजर राहून प्रवेश निश्चित करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, शुल्क भरणे : २५ ते २८ ऑगस्ट
- चौथ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २९ ऑगस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.